मुंबई- देशात सर्वाधिक कोरोना संसर्गाने ग्रासलेल्या महाराष्ट्रामध्ये गेली दोन दिवस सलग १६ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या आढळून आली आहे. केंद्राने अनलॉक ४ च्या गाईडलाईन्स जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
केंद्राच्या ई-पास रद्द करण्याबाबत बंधनकारक सूचनेसह रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, मेट्रो, रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रशासनाने ई-पास रद्द करण्याबाबत तयारी दाखवली आहे. अजूनही खासगी वाहनांना प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. ई-पास रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमातून केली जात आहे. याबाबत राज्याच्या अधिसूचनेमध्ये आज उल्लेख असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यसरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयात उपस्थिती वाढवण्याची शक्यता आहे. सध्या १५ टक्के असलेली उपस्थिती वाढवून ती ३० टक्क्यावर नेण्याचा विचार आहे.
केंद्राच्या अनलॉक-४ बाबत गाईडलाईन्स, काय सुरू, काय बंद?
कंटेन्मेंट झोनबाहेर लॉकडाऊन नाही. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन असणार असून ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था बंदच राहणार आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत ५० टक्के शिक्षक उपस्थित असतील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावता येणार. २१ सप्टेंबरपासून फक्त १०० जणांच्या सहभागात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना मंजुरी असणार. सप्टेंबरपासून मेट्रो-रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरू होणार. मोकळ्या जागांवरील (ओपन एअर) थिएटर २१ सप्टेंबरपासून सुरू करता येणार. सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स बंदच राहणार आहे.
तसेच, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंदच असणार आहे. २१ सप्टेंबरनंतर लग्न समारंभात ५० ऐवजी १०० वऱ्हाड्यांना उपस्थित राहता येणार आहे. २१ सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी २० ऐवजी १०० जणांना हजर राहता येणार आहे.
‘या’ गोष्टी बंदच राहणार