महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे - state government demands of homeopathic medical professionals

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (108 रुग्णवाहिका) रुग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

maha health minister rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Jul 28, 2021, 12:00 PM IST

मुंबई - राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

होमिओपॅथी डॉक्टरांबाबत सरकार सकारात्मक -

मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सां‍गितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (108 रुग्णवाहिका) रुग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्याशी होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -पोर्नोग्राफी प्रकरण : आरोपींमध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठचेही नाव - मुंबई पोलीस

महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी -

सीसीएमपी कोर्स केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी, राष्ट्रीय होमिओपॅथी कमिशनच्या सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोदींनी पागे, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, परिषदेचे रजिस्ट्रार वैद्य सोनमांकार आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details