मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून राज्यातील शाळा बंद आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली जारी केलीय. केवळ पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तसेच शाळेत उपस्थित राहण्याबाबत पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येणार आहे. केवळ तीन ते चार तासच शाळा भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळा सुरू करण्यासंदर्भात सरकारची नियमावली, पालकांची संमती आवश्यक - corona guidelines for schools
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. केवळ पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. शाळेत उपस्थित राहण्याबाबत पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येणार आहे. केवळ तीन ते चार तासच शाळा भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत जारी करण्यात आलेल्या नियमावलीत कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. तीन ते चार तास चालणाऱ्या शाळेत एका दिवशी पन्नास टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील तर त्याचवेळी पन्नास टक्के विद्यार्थी घरीच ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहणार असल्याची सूचना करण्यात आली आहे.
मार्गदर्शक सूचना
* वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी असेल.
* शाळेत कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही.
* शाळेच्या आवारात गर्दी होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या शिक्षकांनी घ्यायची आहे.
* शाळेत विद्यार्थ्यांना एकत्रित बसून जेवणाचे डबे खाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
* शाळेच्या आवारात गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याची आवाहन करतानाच प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी वेगळी मार्गिका करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
* शाळेत विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत बंधन घालता येणार नाही. उपस्थितीकरिता पालकांची संमती आवश्यक असणार आहे.
* केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोना संदर्भांत जनहितार्थ जारी केलेल्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे आहे. यासंदर्भातील अहवालही शिक्षकांना सादर करावा लागणार आहे.
* शिक्षकांना 23 नोव्हेंबरपूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.