महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Health Insurance : राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक कम्युनिटी हेल्थ ऑफिसरांना मिळणार विमा कवच - State Gov will get insurance

राज्यातील हजारो कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांची अनेक दिवसांपासूनची विमा कवच लागू करण्याची मागणी होती. यासाठी राज्यातील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांच्याकडून आंदोलन देखील करण्यात आले होते. याचा परिणाम राज्यातील दहा हजार पेक्षा अधिक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांना विमा कवच मिळणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 8, 2023, 10:36 PM IST

कम्युनिटी हेल्थ ऑफिसरांना मिळणार विमा कवच

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास १०३०० समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवा देत आहे. प्रत्येक समुदाय आरोग्य अधिकारी हे त्याच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात पाच हजार ते वीस हजार समुदायाला नियमित आरोग्य सेवा देत आहे. समुदाय आरोग्य अधिकारी यांना १३ प्रकारच्या आरोग्यसेवा द्याव्या लागतात. आणि या आरोग्य सेवांमध्ये महत्त्वाचे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांच्या अनेक प्रलंबित प्रश्न शासनाने दिरंगाई केल्यामुळे सुटलेला नाही. म्हणून त्यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले. त्यांच्या काम बंद आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होऊ लागल्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नुकताच त्यांच्याबाबतचा सकारात्मक निर्णय शिष्ट मंडळाकडे जाहीर केला आहे.


कम्युनिटी हेल्थ ऑफिसरांची भूमिका : राज्यात गरोदर मातापासून वयोवृद्ध व्यक्तीला सेवा पोहोचवणे, हे समुदाय आरोग्य अधिकारी यांचा उद्देश आहे. याचे फलित म्हणून २०१७ पासून माता मृत्यू दर व बालमृत्यू दर कमी झालेला आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण सुद्धा महाराष्ट्र मध्ये कमी झालेले आहे. महाराष्ट्र मध्ये असंसर्गजन्य रोग जसे की रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप वाढले होते. परंतु आता समुदायाद्वारे वेळोवेळी निदान होत असल्याने व औषधोपचार मिळत असल्यामुळे मृत्यूच्या धोका आता कमी झालेला आहे. तसेच अवेळी मृत्यूचे प्रमाण कमी झाले. यामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सांगितले जाते.

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कार्य :कोरोना महामारीने २०२० पासून जगात थैमान घातले असताना भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळून येत होते. अशा वेळेस महाराष्ट्रातील तमाम समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांना आरोग्यसेवा दिलेली आहे. त्यामध्ये मुख्यत्वे कोविड केअर सेंटर, कोविड तपासणी, लसीकरण, कोविड रुग्ण शोध मोहीम अशा प्रत्येक ठिकाणीच समुदाय आरोग्य अधिकारी यांनी फ्रंट लाईन म्हणून काम केलेली आहेत. कोरोनाच्या रुग्णांना सेवा देत असताना आमचे समुदाय आरोग्य अधिकारी हे स्वतः कोरोना बाधित झाले, अशी भूमिका कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांच्या संघटनेने दिली.



समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागण्या :डॉ. अजित कुमार यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना नमूद केले की, आमच्या परिवारातील कुटुंबीयांना सुद्धा आमच्यामुळे लागण झाली. तसेच काही समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या कुटुंबीयांना सुद्धा जीव गमवावा लागला. एवढे असून सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करून गट "ब" दर्जा देण्यात यावा. तसेच सन 2017 पासून आमच्या हक्काचे ५ टक्के वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस मिळावे. तसेच आमच्या महत्त्वाची मागणी सर्व कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांना विमाकवच आता पुढील काही दिवसात मिळणार आहे.

धोरण निश्चित करावे : डॉ. मनोज पाटील यांनी सांगितले की, महत्वाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून ते वाढ करावे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात धोरण निश्चित करावे. जोपर्यंत उक्त मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सध्याचे २३ इंडिकेटरचे कामावर आधारित मोबदलाचे फॉरमॅट रद्द करून केंद्राने सुचविल्याप्रमाणे १५ इंडिकेटर अमलात आणावे आणि तोपर्यंत प्रति इंडिकेटर रु.१००० देण्यात यावे, ही मागणी देखील आरोग्य मंत्री यांनी मान्य केली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पदोन्नती यांना शासनाने दिली पाहिजे असे डॉक्टर मंडळींचे म्हणणे आहे.


हेही वाचा :Old Film Songs In Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये जुन्या चित्रपट गीतांची सुरेल मैफिल; विजय आशर यांच्या मधुर आवाजाने प्रवासी मंत्रमुग्ध

ABOUT THE AUTHOR

...view details