मुंबई -डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना पार्ट्यांमध्ये दारूचा वापर केला जातो. याच काळात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय होतो. याला आळा घालण्यासाठी पार्ट्यांमध्ये अवैध दारू सापडल्यास विक्रेते आणि ग्राहक या दोघांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. यासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला अवैध मद्य विक्रीचे प्रमाण जास्त असते. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने काम करणार आहे. विनापरवाना, भेसळयुक्त मद्याचा वापर सार्वजनिक समारंभांसाठी करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.