महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, तरुणांना सर्वाधिक संधी मिळण्याची शक्यता - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसला सुमारे 10 आणि राष्ट्रवादीला 13 मंत्रिपद मिळणार आहेत. त्यात काँग्रेसकडून इच्छुकांची बरीच मोठी यादी हायकमांडकडे सोपविण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबतच काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाला मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त संधी द्यावी, अशी मागणी तरुण आमदारांनी केली आहे. यामध्ये नव्यानेच आमदार झालेल्या अनेकांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra cabinet expansion
काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू

By

Published : Dec 23, 2019, 2:40 PM IST

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह डझनभराहून अधिक आमदार आणि नेते दिल्लीत रविवारपासून ठाण मांडून आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नवीन नेतृत्वाला सर्वाधिक संधी द्यावी, अशी मागणी आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसला सुमारे 10 आणि राष्ट्रवादीला 13 मंत्रिपद मिळणार आहेत. त्यात काँग्रेसकडून इच्छुकांची बरीच मोठी यादी हायकमांडकडे सोपविण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबतच काँग्रेसमध्ये यावेळी तरुण नेतृत्वाला मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त संधी द्यावी, अशी मागणी तरुण आमदारांनी केली आहे. यामध्ये नव्यानेच आमदार झालेल्या अनेकांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे राज्यात सामाजिक आणि भौगोलिक समतोल राखण्यासाठी काँग्रेसकडून विविध घटकांना मंत्रिपदांमध्ये समान वाटा मिळेल यासाठी विचार केला जात असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी हायकमांडकडे तयार असल्याचेही बोलले जात आहे. त्यात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचा अपवाद वगळता इतर सर्व तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यातच विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून ते इतर जाणकार नेत्यांना दिले जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details