महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

State cabinet meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; 'या' विषयावर होणार खलबत - या विषयावर होणार खलबत

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात ( State cabinet meeting today ) आली आहे. बैठकीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान, दिवाळीच्या तोंडावर शंभर रुपयांत दिल्या जाणाऱ्या भेट वस्तूंचा आढावा घेतला जाणार आहे. ( cabinet expansion will be disturbed in mumbai )

State cabinet meeting
State cabinet meeting

By

Published : Oct 20, 2022, 1:05 PM IST

मुंबई :राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात ( State cabinet meeting today ) आली आहे. बैठकीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान, दिवाळीच्या तोंडावर शंभर रुपयांत दिल्या जाणाऱ्या भेट वस्तूंचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली जाणार असून नाराजांची विविध महामंडळावर बोलवण करण्याबाबत खलबत होणार आहेत. ( cabinet expansion will be disturbed in mumbai )


हातातोंडाशी आलेले पीक पुराच्या पाण्यात :परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दिवाळी तोंडावर आल्याचे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत आढावा घेतला जाणार आहे. शिवाय, शंभर रुपयांत चार वस्तू देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु, अद्याप या वस्तू रेशनदुकानात पोहचलेल्या नाहीत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत सरकारला धारेवर धरल्यानंतर धावपळ उडाली आहे. याबाबतचा आढावा ही या बैठकीत घेतला जाणार आहे.


आज होणारी मंत्रिमंडळ बैठक महत्वाची :नवीन सरकार स्थापन झाल्यावर तीन महिन्यांनी म्हणजे 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी घोषणा करून अस्वस्थ आमदारांना शांत केले. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अजूनही न झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे आणखीनच नाराजी वाढली आहे. या नाराजांना शांत करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज होणारी मंत्रिमंडळ बैठक महत्वाची मानली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details