महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 8, 2023, 5:49 PM IST

Updated : Feb 8, 2023, 6:56 PM IST

ETV Bharat / state

State Budget Session : २५ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान अर्थसंकलपीय अधिवेशन; पाच आठवडे अधिवेशन घेण्याची अजित पवारांची मागणी

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीपासून पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दि. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अधिवेशनात राज्याचा वर्ष 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवार दि 9 मार्च 2023 रोजी मांडला जाणार आहे.

State Budget Session
State Budget Session

पाच आठवडे अधिवेशन घेण्याची अजित पवारांची मागणी

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या 27 तारखेला सुरू होणार आहे. तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष,अँड राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, आशिष शेलार, सदस्य अमीन पटेल उपस्थित होते.

थोरात यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चा :कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची आज अनुपस्थिती पहायला मिळाली. उपचार सुरू असल्याने बाळासाहेब थोरात बैठकीला येऊ शकणार नाही असे अनुपस्थित राहण्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यावश्याच्या कारणामुळे बाळासाहेब थोरात आज येऊ न शकल्याचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. विधान परिषदेमधील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचा आज विधान परिषदेत शपथविधी पार पडला. या कार्यक्रमाला सर्व नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.


पाच आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी :कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन हे 27 फेब्रुवारी चे 25 मार्चपर्यंत घेण्याचे ठरले असले तरी हे अधिवेशन केवळ तीन आठवडे मूळ कामकाज होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचे दिवस वाढवण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. अधिवेशन पाच आठवड्याचे करण्यात यावे अशी मागणी अजित पवारांकडून करण्यात आली. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल. त्यानंतर कामकाजाचे दिवस वाढवायचे का याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन सरकारी पक्षाकडून देण्यात आल्याचे अजित पवार यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना सांगितले.


मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष :मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सव वर्ष साजरे व्हावे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सव वर्ष आहे. आम्ही सत्तेमध्ये असताना मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा व्हावा, अशी लोक भावना आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकार असताना 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, आता सरकार बदलले असले तरी सरकारने याचा विचार करून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष हे साजरा केला पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.



हेही वाचा -Parliament Budget Session : मोदींच्या एका मित्राची संपत्ती अडीच वर्षात १३ पटींनी वाढली - मल्लिकार्जुन खरगे

Last Updated : Feb 8, 2023, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details