मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढवण्याचे मोठे आव्हान राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर उभे ठाकले आहे. त्यानुसार आता परिषदेनेही रक्तदान शिबिरे घेत रक्तसाठा वाढवण्यास मदत करावे, अशा सूचना परिषदेकडून करण्यात आली आहे.
5-7 दिवस पुरेल इतकाच साठा
राज्यात 200 हून अधिक रक्तपेढ्या असून या रक्तपेढ्यांमध्ये किमान 20 दिवस पुरेल इतका साठा असायचा. पण, आता 5 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहत आहे. याला कारण म्हणजे कोरोना. कोरोना काळात वैयक्तिक रक्तदाते कमी झाले असून रक्तदान शिबिरांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. तर रक्तदातेही भीती पोटी रक्तदानासाठी पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे रक्तसाठा कमी होताना दिसत आहे. परिणामी सध्याच्या घडीला 20 दिवसांऐवजी 5 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
गृहनिर्माण सोसायटीत वाहनाद्वारे होणार रक्त संकलन