मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र ज्यांचे हातावर पोट आहे अशा नागरिकांचे या दिवसात मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हाताला काम नाही ,खायला अन्न नाही, अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे.
LOCK-DOWN : दोन दिवस उपाशी राहिल्यावर एकवेळचे जेवण मिळतंय..मुंबईतील बेघरांची करुण कहाणी - लॉकडाऊन
मुंबई रस्त्यावर राहणारी अनेक कुटुंबे आहेत जे मिळेल ते काम करतात आणि दोन वेळचं पोट भरतात. पण देशभरात लॉक डॉऊन करण्यात आल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्या या दयनीय अवस्थेबद्दल..

मुंबई रस्त्यावर राहणारी अनेक कुटुंबे आहेत जे मिळेल ते काम करतात आणि दोन वेळचं पोट भरतात. पण देशभरात लॉक डॉऊन करण्यात आल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही सामाजिक संघटना आणि समाजसेवक या लोकांना जेवणाच्या काही वस्तू पुरवतात मात्र दोन दिवस उपाशी राहिल्यावर एक वेळचे खायला मिळत आहे, अशी वेळ त्यांच्यावर आल्याचे सांगितले जातंय. आम्हाला शासनाने मदत करावी जे सुरू आहे त्यासोबत आम्ही आहोत मात्र आमचे होणारे हाल थांबवावे, अशी विनंती राज्य सरकारला या या नागरिकांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली ईटीवी भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.