मुंबई- मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील भाडेकरू व रहिवाशांची पात्रता निश्चिती व गाळे वितरणाच्या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज सुरुवात झाली. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते आज या प्रक्रियेला सुरुवात झाली. मूळ भाडेकरू व रहिवासी अथवा त्यांच्या वारसदारांना ऑनलाईन अर्जदारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
हे अर्ज भरण्यासाठी १६ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक लाभ भाडेकरू व रहिवाशांनी घेण्याचे आवाहन घोसाळकर यांनी केले. मास्टर लिस्टसाठी यापूर्वी ऑफलाईन अर्ज केले आहेत. परंतु पात्रता निश्चिती न झालेल्या भाडेकरू व रहिवाशांनी या नवीन प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे सभापती घोसाळकर यांनी सांगितले आहे.