मुंबई :संपूर्ण देशभरात गाजलेल्या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर वेब सिरीजवरील निर्मात्यांविरुद्ध मुंबई शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटीने याचिका दाखल केली (Telgi daughter moves Mumbai civil court) आहे. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी हिने त्याच्या जीवनावर आधारित वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली (Web Series On Telgi) आहे. स्टॅम्प पेपर घोटाळा 2003 मधील मुख्य दोषी आरोपी अब्दुल करीम लाला यांच्या संबंधित येणाऱ्या वेब सिरीज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या वेब सिरीजच्या प्रदर्शनापूर्वी मुख्य आरोपी तेलगीच्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सिरीजला प्रदर्शित करण्यापासून थांबवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अधिकाराचे उल्लंघन :या प्रमुख प्रकरणातील आरोपी तेलगीच्या कुटुंबीयांनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात ॲपलॉज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हंसल मेहता, सरव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लिव्ह यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. वकील माधव थोरात यांच्यामार्फत दाखल केलेल्या दाव्यात सनाने आरोप केला आहे की, ही मालिका एका पुस्तकावर आधारित आहे. ज्यात तथ्यात्मक विसंगती आहेत. या प्रकरणातील याचिककर्ती सना इरफान तालिकोटी दावा केला की, वेब सिरीज कुटुंबाच्या गोपनीयता सन्मान आणि स्वाभिमानाच्या अधिकाराचे उल्लंघन करते (stamp paper scam accused Telgi) आहे.
वडिलांची बदनामी :सना इरफान तालिकोटी आरोप केला आहे की, कादंबरीवर आधारित आमच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेचे चित्रण खोटे, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय, अत्यंत बदनामीकारक आहे. आमची, आमच्या कुटुंबाची आणि आमच्या मृत वडिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल असे म्हटले आहे. याचिककर्ती सना इरफान तालिकोटी पुढे म्हणाली की, वेब सीरिजमुळे तिच्या अल्पवयीन मुलांचेही नुकसान होईल. तिने सांगितले की, तिच्या वडिलांनी अनेक सामाजिक कारणांसाठी बराच वेळ, पैसा खर्च केला होता. पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, मंदिरे आणि मशिदी बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यांनी अनेक गरीब मुलांना शैक्षणिक कर्ज देखील दिले होते, असे म्हटले (court against web series on Telgi) आहे.
बनावट स्टॅम्प पेपर :स्टॅम्प पेपर घोटाळ्यामधील भूमिकेसाठी 30 वर्षांची शिक्षा भोगत असताना 56 वर्षीय तेलगीचा ऑक्टोबर 2017 मध्ये बेंगळुरूच्या रुग्णालयात मृत्यू झाला. 1993 ते 2002 दरम्यान त्याने नाशिकमधील सरकारी सुरक्षा मुद्रणालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बनावट स्टॅम्प पेपर छापण्यासाठी सरकारी लिलावात मशिनरी खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने बँका, विमा आणि स्टॉक ब्रोकरेज फर्म्स यांसारख्या मोठ्या खरेदीदारांना सवलतीत विकले (stamp paper scam) होते.
कोटी रुपयांचा घोटाळा :या प्रकरणातील मुख्य आरोपी तेलगीला 22 नोव्हेंबर 2001 रोजी बेंगळुरू येथे अटक करण्यात आली होती. तेलगीच्या अटकेनंतर शेकडो कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाला. त्यानंतरच्या तपासात त्याचे अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे देखील नाव तेलगी सोबत त्यावेळी जोडले गेले होते. महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये तेलगीवर सुमारे 48 गुन्हे दाखल आहे. ज्यात पुण्यातील बंड गार्डन पोलिस स्टेशनमधील सर्वात हायप्रोफाइल प्रकरणाचा समावेश होता. ज्यामध्ये पोलिसांनी 500 कोटींचे स्टॅम्प पेपर जप्त केले होते. सीबीआयने नंतर सर्व प्रकरणे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष मकोका कोर्टात एकत्र केली (stamp paper scam accused Telgi daughter) होते.