मुंबई - कोरोनाचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. या आर्थिक संकटातून या क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात सवलत दिली आहे. 5 टक्क्यांचे मुद्रांक शुल्क दर 31 डिसेंबर पर्यंत 3 टक्क्यांनी कमी करत ते 2 टक्के केले. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा ग्राहक, बिल्डर आणि महसुलाच्या रूपाने होताना दिसत आहे. पण आता या दोन टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. तेव्हा घर घेणाऱ्या ग्राहकांनो त्वरा करा आणि दोन दिवसात मुद्रांक शुल्क भरा अन्यथा 1 जानेवारीपासून तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागेल.
असा होता सरकारचा निर्णय
कोरोनाच्या आर्थिक संकटातुन बांधकाम व्यवसायाला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार 24 ऑगस्ट 31 डिसेंबर 2020 पर्यंत पाच टक्क्यांवरून मुद्रांक शुल्क दोन टक्के केले तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत तीन टक्के मुद्रांकशुल्क लागू केले मुद्रांक शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने हा बिल्डर ग्राहक आणि सरकार सगळ्यांसाठीच मोठा सकारात्मक निर्णय ठरला आहे. दरम्यान दोन टक्के मुद्रांक शुल्काचे मुदतवाढ संपण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत.
दोन टक्के मुद्रांक शुल्क मुदतवाढ देण्याची होती मागणी
पास टक्क्यांऐवजी दोन टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. त्यांचा आर्थिक फायदा होत आहे या पार्श्वभूमीवर दोन टक्के मुद्रांक काला मुदतवाढ देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात होती मात्र काल राज्य सरकारने अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता एक जानेवारीपासून ग्राहकांना तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. एक मार्च पर्यंत तीन टक्के मुद्रांक शुल्काच्या सवलतीचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. दरम्यान दोन टक्के मुद्रांक शुल्क योजनेला मुदतवाढ राज्य सरकारने नाकारली आहे. पण आता निदान 31 मार्चनंतर तीन टक्के मुद्रांक शुल्क योजनेला तरी मुदतवाढ द्यावी अशी मागणी आता ग्राहक करत आहेत. तेव्हा त्यांची ही मागणी मान्य होते का हेच पाहणे आता महत्वाचे असणार आहे.
ग्राहकांनो त्वरा करा, 2 टक्के मुद्रांक शुल्कासाठी उरले 2 दिवस - मुंबई मुद्रांक शुल्क दर 2 टक्के
5 टक्क्यांचे मुद्रांक शुल्क दर 31 डिसेंबर पर्यंत 3 टक्क्यांनी कमी करत ते 2 टक्के केले. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा ग्राहक, बिल्डर आणि महसुलाच्या रूपाने होताना दिसत आहे. पण आता या दोन टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. तेव्हा घर घेणाऱ्या ग्राहकांनो त्वरा करा आणि दोन दिवसात मुद्रांक शुल्क भरा अन्यथा 1 जानेवारीपासून तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागेल.
मुंबई मुद्रांक शुल्क दर 2 टक्के
Last Updated : Dec 29, 2020, 1:22 PM IST