मुंबई - कोरोना काळात मुंबईकरांच्या सेवेत राज्यभरातून एसटी कर्मचारी दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवण मिळत नसल्याची तक्रार होती. याची दखल घेत या कर्मचाऱ्यांना आता रोज २२५ रुपये भोजन भत्ता देण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले.
'मुंबईकरांच्या सेवेतील एसटी कर्मचाऱ्यांना रोज मिळणार २२५ रुपये भोजन भत्ता' - Mumbai corona update
एसटी करणार्यांच्या जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परब यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन सदर खासगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करण्यात आले आहे.
खासगी कंपनीचे कंत्राट रद्द -
गेली दोन महिने एसटीच्या सुमारे १ हजार बसेस मुंबईतील बेस्ट वाहतूकच्या मदतीसाठी धावत आहेत. त्यासाठी सुमारे ४ हजार ५००पेक्षा अधिक एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत दाखल झाले आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परब यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन सदर खासगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश मंत्री परब यांनी दिले होते. त्यानुसार एसटी प्रशासनातर्फे त्वरित कार्यवाही करून सदर भोजन व्यवस्था बंद करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले.
या ठिकाणाहून आले आहेत कर्मचारी -
नाशिक एसटी आगार, मनमाड आगार, सटाणा आगार, सिन्नर आगार, इगतपुरी आगार, लासलगाव आगार , कळवण आगार, पेठ आगार, येवला आगार, पिंपळगाव आगार, मालेगाव आगार, नांदगाव आगार राज्यभरातील विविध एसटी आगारातून एक हजार गाड्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.