मुंबई- मागील दोन आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सुमारे शंभर कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाला संपामुळे आज सुमारे 15 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. संपावर लवकर तोडगा निघाला नाही तर हा तोटा वाढण्याची भीती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दररोज 15 कोटी रुपयांचा महसुलावर पाणी
महाराष्ट्रात सार्वजनीक वाहतूकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, असेही एसटीला संबोधले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एसटीमध्ये उत्पन्नपेक्षा सेवेसाठी खर्च जास्त होत आहे. तसेच दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या तोटा वाढत जात असल्यामुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. त्यातच आता आपल्या विविध मागण्या घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप आता चांगलाच चिघळला असून यामुळे प्रवाशांबरोबर एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी 100 कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. एसटी महामंडळाला संपामुळे आज सरासरी 15 कोटी रुपयांचा महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
राज्यातील 240 आगार बंद