मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाच्या जागतिक साथीचा नेटाने मुकाबला सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटातून राज्यातील जनतेला वाचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एसटी कामगार सेनेनेही आपला खारीचा वाटा उचलून मुख्यमंत्री साहय्यता निधीला पाच लाख रुपयांची मदत दिली आहे.
एसटी कामगार सेनेची मुख्यमंत्री साहय्यता निधीला पाच लाखांची मदत - कोरोना मुंबई ताजी बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने मुख्यमंत्री साहय्यता निधीचा ५ लाखांचा धनादेश सोमवारी सुपूर्द केला आहे.
राज्यावर ओढवलेल्या या संकटात सामाजिक दायित्व म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत तसेच सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे ५ लाख रुपयांची मदत केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत व सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्री साहय्यता निधीचा ५ लाखांचा धनादेश सोमवारी सुपूर्द केला. यावेळी कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, निवासी सचिव नारायण उतेकर, कामगार सेना मुंबई आगार अध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते.