मुंबई : शासनाने 300 कोटी रुपये निधीचा केवळ निर्णय केला आहे. मात्र कर्मचाऱ्यांची वणवण काही संपत नाही. 950 कोटी रुपये ऐवजी केवळ 300 कोटी रुपये देऊन शासन बोळवण करीत आहे, असा घणाघात एसटी कर्मचारी काँग्रेस नेते श्रीरंग बरगे यांनी केला आहे. दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत पगार देणे हे न्यायालयाने सांगितलेल्या निर्देशानुसार आहे.
कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल असा इशारा : आता 13 तारीख आली तरी सुद्धा कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही म्हणून हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे फडणवीस सरकारची ही कामगार विरोधी भूमिका उघड झाली आहे. सरकार कर्मचाऱ्यांशी लबाडी करीत असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल असा इशारा महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला होता.
भाजपाचा दुटप्पीपणा आला समोर :वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारीखला कर्मचाऱ्यांना वेतन मिळायचे पण या महिन्यात सुद्धा 12 तारीखपर्यंत सुद्धा वेतन मिळालेले नाही. या विषयावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विरोधी पक्षात असताना संपात कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलणारे भाजपनेते आता सत्तेत आल्यानंतर मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाची संप काळातील भूमिका व आताची भूमिका पाहिली तर भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. संप काळात संप चिघळला जावा यासाठी फुकट अन्न धान्य पुरवणारे आता कष्टाचा महिन्याचा पगार वेळेवर द्यायला तयार नाहीत. ही लबाडी असून लवकरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. इतर सर्व संबंधितांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल. असेही बरगे यांनी म्हंटले होते.
अंमलबजावणी होण्यामध्ये जाणार दोन दिवस :राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आणि महागाई भत्ता याबाबतचा शासनाने निर्णय घेतला मात्र एसटी महामंडळाचे 950 कोटी रुपये हे आधीपासूनच स्थित आहे आणि त्याच्यापैकी केवळ 300 कोटी रुपये देऊन हे शासन बोळवण करीत असल्याची भावना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची झालेली आहे. त्याचे कारण हे शासन खोटे बोलत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ करताना आणि महागाई भत्ता देताना एसटी कर्मचारी मात्र यांना आठवत नाही त्यांचा पगारही शिंदे फडणवीस शासन वेळेवर करत नाही. निर्णय जरी काल झाला तरी त्याची अंमलबजावणी होण्यामध्ये दोन दिवस जाणार. शनिवार रविवार असल्याने हे दोन दिवस जाणार त्यामुळे पगार सोमवारी होणार.