महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी कर्मचारी बँक प्रकरण; बँक वाचवण्यासाठी सहकार खात्यानं हस्तक्षेप करावा, कामगार संघटनांची मागणी

ST Employee Bank : एकेकाळी वकिली करणारे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलनं एस टी कर्मचारी बँकेवर सत्ता स्थापन केल्यानंतर ही बँक चांगलीच चर्चेत होती. मात्र बँकेच्या 11 संचालकांनी राजीनामा दिल्यानं गुणरत्न सदावर्ते अडचणीत आले आहेत. त्यानंतर कामगार संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

ST Employee Bank
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 9:37 AM IST

Updated : Dec 28, 2023, 10:21 AM IST

श्रीरंग बर्गे, नेते, काँग्रेस कामगार संघटना

मुंबई ST Employee Bank : एसटीतील हजारो वाहक चालक आणि कर्मचारी यांची खाती असलेली एसटी बँक आता दिवाळखोरीकडं निघाली आहे. या बँकेला वाचवायचं असेल, तर आता सहकार खात्यानं हस्तक्षेप करायला पाहिजे. बँकेतील अकरा संचालकांचा गट आता वेगळा झाल्यानं हा गट वेगळा स्थापन करावा. सहकार खात्यानं बँक वाचवण्यासाठी योग्य पावलं उचलावी, अशी मागणी काँग्रेस कामगार संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.

एसटी कर्मचारी बँक आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर :एसटी कामगारांची अत्यंत जिव्हाळ्याची असलेली एसटी कर्मचारी बँक आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली आहे. कोणताही अनुभव नसलेल्या गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असलेल्या मेव्हण्यानं बँकेमध्ये गैर कारभार सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढून घेण्याला सुरुवात केली आहे. अशातच बँकेच्या गैर कारभाराला आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या मनमानीला कंटाळून 11 संचालकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. ही बँक आता वाचवायची असेल तर सहकार खात्यानं हस्तक्षेप करावा, अशी मागणी एसटी कामगार काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.

समाजात जातीय विष पसरवण्याचं काम :या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना संतोष शिंदे म्हणाले की, "गुणरत्न सदावर्ते हे समाजात जातीय विष पसरवण्याचं काम करतात. गुणरत्न सदावर्ते यांनी कामगार विरोधी मागण्या राबवण्याचं काम केलं आहे. तसंच त्यांनी कामगारांची फसवणूक केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कामगारांना लागलेला कलंक आहेत, अशा शब्दात संतोष शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.

गुणरत्न सदावर्ते यांचा कुटील डाव :सदावर्ते यांच्यापासून दूर झालेल्या संचालकांचा वेगळा गट तयार झाला असून त्यांनी एसटी बँकेचे अध्यक्ष म्हणून तात्पुरता पदभार स्वीकारलेले परिवहन आयुक्त विवेक विमलवार यांना भेटून निवेदन दिलं आहे. बँकेत सदावर्ते यांच्या मेव्हण्याला हटवून चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी या संचालकांनी केली आहे. मात्र संचालकांची बैठक होऊ नये, यासाठी सदावर्ते आपल्या मेहुण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत, असा दावाही संतोष शिंदे यांनी केला. त्यामुळं एसटी कामगारांचा गळ्यातील एकेकाळी ताईत बनलेले गुणरत्न सदावर्ते आता एसटी बँकेतून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. सदावर्ते यांच्या कारकीर्दीला अल्पावधीतच एसटी कामगार आणि बँकेचे संचालक कंटाळल्यानं गुणरत्न सदावर्ते यांची बँकेतील अल्पकालीन सत्ता संपुष्टात येत आहे.

हेही वाचा :

  1. Saamana Editorial : गाढव तुरुंगात जाताच 'लाल परी' मुक्त! सामनातून सदावर्तेंना फटकारे
  2. ST Chakka Jam Andolan : ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल; गुणरत्न सदावर्तेंनी दिली चक्का जामची हाक
  3. ST Employees : आम्ही कुठल्याही संपात सहभागी होणार नाही; एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया
Last Updated : Dec 28, 2023, 10:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details