मुंबई :महाराष्ट्र शासन वेळोवेळी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध आणि अनेक प्रकारच्या योजनांची आखणी व अंमलबजावणी करत असते. या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असते. (2022)मध्ये मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सावानिमित्त ही घोषणा केली होती. तसा निर्णयदेखील झाला. त्यावर कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर आता दखल घेण्यात आली आहे.
तक्रारी दूर करण्याचे मनावर घेतले : महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नागरिकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यातील ज्या जेष्ठ नागरिकांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण केले आहे अशा जेष्ठ नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही.कारण 50 टक्के भाडे सवलत त्यात आहे. मात्र, जेष्ठ नागरिकांकडून एसटी बाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने आता तक्रारी दूर करण्याचे मनावर घेतले.
ज्येष्ठ नागरिकांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या : राज्यामधील हजारो नागरिकांना प्रवास करण्यासाठी शासनाची योजना चांगली आहे मात्र प्रवास करताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना गावात शहरात वाहक किंवा चालक किंवा एसटी महामंडळाचे कर्मचारी यांच्याकडून ओळखपत्र दाखवून सुद्धा सहकार्य होत नव्हते. त्यामुळे प्रवास करणे मुश्किल झाले होते. शासनाने जे ओळखपत्र यासाठी सांगितलेले आहे ते ओळखपत्र जेष्ठ नागरिकाकडे असल्यावर तरी देखील विनाकारण गरज नसताना इतर ओळखपत्राचे विचारणा ज्येष्ठ नागरिकांकडे केली जात होती. त्यामुळेच राज्याच्या निम्म्यापेक्षा अधिक जिल्ह्यातून याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची अखेर आज दखल घेतली गेली. यामध्ये एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात त्रास होणार नाही बाबत निर्णय घेतला आहे.
महामंडळाने निर्णय घेतला : एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक रा. भ. जगताप यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की ,"नागरिकांसाठी शासनाने एसटी भाड्यामध्ये सवलत जाहीर केली होती त्यानुसार काही नागरिकांनी प्रवास करणे सुरू केले मात्र त्यांना ओळखपत्र असून सुद्धा अनेक ठिकाणी विविध कागदपत्रांची विचारणा केली जात होती याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आज महामंडळाने त्याचा निर्णय घेतला आणि नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत योग्य ते निर्देश सर्व अधोरेखित केले.
हेही वाचा :काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचा आंबेडकरांचा पंगा ठाकरे गटाला ठरतोय डोकेदुखी