मुंबई - एसटीच्या वर्ग १ आणि २ अधिकारी पदासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. ही परीक्षा १७ ,१८ ,१९ मे रोजी होणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच, ज्या पात्र उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांची प्रवेशपत्रे ई-मेल पत्यावर पाठवण्यात आली आहेत.
एसटीच्या वर्ग १ व २ अधिकारी पदाची लेखी परीक्षेची तारीख जाहीर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र अजुनही प्राप्त झालेले नाहीत, तसेच काही शंका असल्यास १८००५७२२००५ या निःशुल्क दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा.
सदर परिक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. १०० प्रश्नांच्या या परिक्षेत प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील. परिक्षेचा कालावधी दीड तास असणार आहे, अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र अजुनही प्राप्त झालेले नाहीत, तसेच काही शंका असल्यास १८००५७२२००५ या निःशुल्क दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा. तसेच उमेदवारांनी कोणत्याही अवैध प्रलोभन अथवा अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे परिक्षा दयावी, असे आवाहनही एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.