महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Bus Accident: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर एसटी बसला भीषण अपघात; बस उलटली - एमजीएम रुग्णालयात दाखल

ST Bus Accident: पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे- सांगली बस क्रमांक MH40N9164 ही भरलेल्या बसचा अपघात होऊन बस पलटी झाली आहे. यामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल MGM Hospital करण्यात आले आहे.

ST Bus Accident
ST Bus Accident

By

Published : Oct 22, 2022, 10:35 PM IST

नवी मुंबई:पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे- सांगली बस क्रमांक MH40N9164 ही भरलेल्या बसचा अपघात होऊन बस पलटी झाली आहे. यामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल MGM Hospital करण्यात आले आहे.

अपघातात बस उलटली

महामार्गावर वळण घेत असताना बस पलटी:कोन पुलावरून महामार्गावर जाणार वळण घेत असताना, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून खाली झाडांमध्ये पलटी झाली. बस प्रवाशाची खचून भरली होती. दिवाळी सणासाठी चाकरमानी मुंबईहून गावी जाण्यासाठी या बसमधून प्रवास करत होते. या बसमधून तब्बल 46 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व प्रवासी बसमध्येच अडकून पडली. महामार्ग पोलीस केंद्राला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

बसच्या पाठीमागील काचा फोडून प्रवासी बाहेर:बसच्या पाठीमागील काचा फोडून प्रवासी तसेच त्यांचे सामान बाहेर काढण्यात आले. या अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी झालेत. तसंच बसचालक देखील गंभीर जखमी असून त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी आयआरबी रुग्णवाहिकेने एमजीएम कळंबोलीतील दवाखान्यात दाखल करण्यात आल आहे. महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत करत सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप बाहेर काढलं. भांबावलेल्या प्रवाशांना आधार देऊन महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. याशिवाय त्यांना पर्यायी वाहनांची देखील व्यवस्था करून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांचे विशेष आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details