मुंबई: कांदिवली पोलिसांनी गुरुवारी इयत्ता दहावीच्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यावर २६ नोव्हेंबरला त्यांच्या शाळेबाहेर एका वर्गमित्राला चाकू हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली. हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. एका स्थानिक रहिवाशाने चित्रित केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी कांदिवली पोलीस तपास करत आहेत. जखमी विद्यार्थ्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
३२६ अंतर्गत गुन्हा नोंदवला:त्याला ट्रायडंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 19 टाके घातल्यानंतर बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. व्हिडिओची दखल घेऊन, कांदिवली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ अंतर्गत गुन्हा नोंदवला. आरोपी फरार असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. आम्ही त्याच्या पालकांना बोलावले आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
एका मुद्द्यावरून भांडण:पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि आरोपी कांदिवली पश्चिमेकडील एका शाळेत शिकतात. तपासादरम्यान असे समजले की, घटनेच्या काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये एका मुद्द्यावरून भांडण झाले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने रागाच्या भरात पीडितावर हल्ला केला आहे. व्हिडिओमध्ये डझनभर विद्यार्थी आणि स्थानिक हा हल्ला पाहताना दिसत आहेत. पीडित विद्यार्थ्याला स्कूटरवर बसवलेले असताना आरोपीने चाकू काढला आणि त्वरीत हल्ला केला.
भीतीचे वातावरण पसरलं: या हल्ल्यात त्याचा तोल गेला. त्यानंतर आरोपी मुलगा काही विद्यार्थ्यांसोबत पळताना दिसत आहे. ट्रायडंट हॉस्पिटलमधील डॉ अनिल यादव यांनी पुष्टी केली की, तरुणावर तेथे उपचार करण्यात आले होते. जेव्हा या रिपोर्टरने शाळेच्या कर्मचार्यांशी बोलले तेव्हा त्यांना सोमवारी येण्यास सांगण्यात आले आहे. कारण या विषयावर चर्चा करण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यक्ती उपस्थित नव्हती.
कांदिवली पोलीसांकडे तपास: कांदिवली पश्चिमेकडिल एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून या घटनेचा परिसरातील नागरिकांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला आहे.