महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

form number 17 application : माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षेत 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, वाचा सविस्तर

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षेत 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली ( ssc hsc exam form number 17 application extended ) आहे. 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत फोर्म भरण्याची तारिख होती ती आता 12 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली ( form number 17 application extended ) आहे. त्यामुळे आता दहावीच्या आणि इयत्ता बारावीच्या खासगीरीत्या 17 नंबर फॉर्मद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता याचा लाभ होणार आहे.

10th and 12th students
दहावीच्या आणि बारावी विद्यार्थी

By

Published : Jan 9, 2023, 1:53 PM IST

मुंबई : दहावीच्या आणि बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेसाठी खासगीरित्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाइन अर्ज 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत ( ssc hsc exam form number 17 application extended ) होती. त्यामध्ये मुदत वाढ करून 12 जानेवारी 2023 अशी करण्यात आलेली ( number 17 application extended till 12 Jan ) आहे. त्यामुळे आता दहावीच्या आणि इयत्ता बारावीच्या खासगीरीत्या 17 नंबर फॉर्मद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता याचा लाभ होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करता येणार : राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क 20 रुपये प्रतिविद्यार्थी भरून परीक्षा मंडळाकडे ऑनलाइन अर्ज आता करता येऊ शकेल. त्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना 10 जानेवारी 2023, तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना 12 जानेवारी 2023 या तारखेपर्यंत हे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावीसाठी खासगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करत असताना अर्ज ऑनलाईनच करावयाचा ( form number 17 application extended ) आहे. त्यामुळे ऑफलाईन कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी परीक्षा मंडळाने दिलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमधून ते अर्ज उपलब्ध करून दिलेले आहे.

फॉर्म क्रमांक 17 साठी ही कागदपत्रे : फॉर्म क्रमांक 17 हा फार महत्त्वाचा ( form number 17 application ) असतो. ज्यांची परीक्षा राहिलेली आहे त्यांना या द्वारे परीक्षा देता येतात. त्यामुळे शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत नसल्यास त्याची नक्कल प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो हे सर्व कागदपत्र आधी स्कॅन करून घ्याययाची आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना हे स्कॅन केलेले कागदपत्र त्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायची ( ssc hsc exam ) आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यी स्कॅनर मोबाईलद्वारे ते फोटो काढून अपलोड करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक व स्वतःचा अधिकृत ईमेल आयडी वापरावा.

खासगी विद्यार्थ्यांसाठी शुल्क फी : इयत्ता दहावीसाठी प्रति विद्यार्थी 1000 रुपये नोंदणी शुल्क, 100 रुपये प्रक्रिया शुल्क, त्याशिवाय विलंब, अतिविलंब शुल्क आहे. इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क 100 रुपये प्रक्रिया शुल्क अधिक विलंब फी तसेच अधिक अतिविलंब शुल्क याप्रमाणे एकूण नाव नोंदणी शुल्क असेल. इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी फेब्रुवारी, मार्च 2023 साठी जे फॉर्म क्रमांक 17 द्वारे ऑनलाईन अर्ज नाव नोंदणी करतील त्यांनी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि नेट बँक द्वारेच ऑनलाईन भरणा करावयाचा आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा केल्यावर विद्यार्थ्याला त्याची पोच पावती दिली जाईल. ती पोच पावती त्याने दोन नकलप्रती काढाव्या. आणि त्या आपल्या संपर्क केंद्राला द्याव्यात तसेच एकदा नाव नोंदणी केल्यावर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणीचे शुल्क परत केले जाणार नाही.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास सोय : दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरीत्या 17 क्रमांक फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज भरायचा असल्यास त्यांनी दिव्यांग असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाकडे जाऊन त्याच्या प्रमाणपत्राची नक्कल प्रत अर्जासोबत जोडावीची आहे. आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ कनिष्ठ महाविद्यालय तसेच संपर्क केंद्र यांच्याकडून याबाबत तपशीलवार माहिती प्राप्त करून घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज भरताना किंवा कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अशी माहिती परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओ यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांनी दूरध्वनी क्रमांकावर 02025705207 /020 25705271 संपर्क साधावा.

ABOUT THE AUTHOR

...view details