महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संकट: क्वारंटाईन सेंटरसाठी 22 मजली एसआरए इमारत पालिकेच्या ताब्यात - SRA building mumbai

मुंबईत मोठ्या संख्येने नागरिकांना क्वारंटाईन करावे लागणार हे मार्चमध्येच ओळखत विविध पर्यायाचा शोध पालिकेने सुरू केला होता. त्यानुसार म्हाडा आणि एसआरएकडे रिकाम्या घरांची मागणी मार्चमध्येच केली होती.

sra building
sra building

By

Published : May 11, 2020, 7:55 PM IST

मुंबई-कोरोनाग्रस्तांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्याना क्वारंटाईन करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा (एसआरए) च्या ताब्यात रिकाम्या एसआरए इमारती मुंबई महापालिकेकडून ताब्यात घेतल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबईतील विविध ठिकाणची 3 हजार घरे ताब्यात घेतल्यानंतर आता पालिकेने ताडदेव एम पी मिल प्रकल्पातील 22 मजली इमारतही ताब्यात घेतली आहे. यातील 118 घरांचा वापर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यासह डॉक्टरांच्या निवासासाठी वापरणार असल्याची माहिती डी विभागाचे वॉर्ड अधिकारी
प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा-केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला

मुंबईत मोठ्या संख्येने नागरिकांना क्वारंटाईन करावे लागणार हे मार्चमध्येच ओळखत विविध पर्यायाचा शोध पालिकेने सुरू केला होता. त्यानुसार म्हाडा आणि एसआरएकडे रिकाम्या घरांची मागणी मार्चमध्येच केली होती. म्हाडा-एसआरएने ही मागणी तत्काळ मान्य करत मुंबईतील विविध ठिकाणची 10 हजारांहून अधिक घरे शोधून ती पालिकेला देण्याचा निर्णय घेतला.


या निर्णयानुसार पालिकेने आतापर्यंत एसआरएची अंदाजे 3 हजार घरे ताब्यात घेतल्याची माहिती एसआरएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर त्यानंतर डी विभागात घरांची मागणी पालिकेकडून करण्यात आली होती. त्यानुसार एम पी मिल प्रकल्पातील 22 मजली इमारत गेल्या आठवड्यात पालिकेला ताब्यात दिल्याची माहिती एसआरएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर ही इमारत ताब्यात घेत तिथे क्वारंटाईन सेंटर तयार करण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

या 22 मजली इमारतीत 144 घरे असून त्यातील 118 घरे वापरण्याजोगी आहेत. त्यानुसार पहिल्या तीन मजल्यावर डॉक्टरांच्या निवासाची सोय करण्यात येत असून उर्वरित घरात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. एका घरात 4 ते 5 रुग्ण ठेवता येतील अशी रचना करून घेतली जात आहे. तर गरज पडल्यास एसआरएकडे आणखी घराची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details