मुंबई - वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलने बहुप्रतिक्षित स्फुटनिक व्ही लसीकरण ड्राइव्ह यशस्वीरित्या सुरू केली आहे. दोन डोस दरम्यान 21 दिवसाचे अंतर भारतात मंजूर झाले आहे. यामुळे मुंबईकरांना लसीचे विविध पर्याय मिळाले आहेत. वॉकहार्ट मुंबई सेंट्रल येथील मॅनेजमेंटने स्फुटनिक व्ही सा ठी अर्ज केला होता. कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्फुटनिक व्ही या तीनही लसी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये मुंबईकरांना उपलब्ध आहेत. यामुळे मुंबईतील अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्यास मदत होणार आहे. लसीकरण सकाळी 9.00 ते दुपारी 4: 00 या कालावधीत कोविन ॲपवर पूर्व नोंदणीसह उपलब्ध असेल.
लसीकरण मोहिमेवर बोलताना मुंबई सेंट्रल, वॉकहार्ट हॉस्पिटलचे प्रादेशिक प्रमुख डॉ. पराग रिंदानी म्हणाले, “आत्तापर्यंत आम्ही मुंबईकरांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसी दिल्या आहेत. आता गेल्या दोन दिवसांपासून आम्ही स्फुटनिक व्ही लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दोन्ही वयोगटांसाठी स्फुटनिक व्ही लस देण्यासाठी कोविन अॅपमार्फत 200 अपॉइंटमेंट्स बुक केल्या आहेत. लस घेणे हा स्वत:ला कोविडपासून वाचवण्याचा एकमात्र मार्ग आहे", असेही ते म्हणाले.