महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 16, 2022, 7:52 PM IST

ETV Bharat / state

UNICEF Workshop : भारतात 'या' कारणांमुळे गोवरचा प्रसार वाढला; रुग्णांचे सेरो सर्व्हेक्षण केले जाणार

गोेवरचे लसीकरण झाले नसल्याने (Non vaccination), पौष्टिक आहाराचा (lack of nutritious diet) अभाव आणि लसीकरणाची भीती (fear of vaccination) यामुळे मिसेल म्हणजेच गोवर भारतात पसरला (Spread of micelles increased in India), अशी माहिती युनिसेफचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. आशिष चौहान यांनी दिली. तर आपल्या मुलांना पुढे आजार होऊ नये म्हणून वेळेवर लस द्यावी (anit micelles vaccination) , असे आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशनच्या (World Health Organization) डॉ. मीता यांनी केले आहे. देशात युनिसेफ वर्कशॉप अंतर्गत (UNICEF Workshop) कोरोना प्रमाणे मिसेलच्या रुग्णांचा सेरो सर्व्हेक्षण केले जाणार असल्याची माहिती डॉ. मीता यांनी दिली.

UNICEF Workshop
युनिसेफ कार्यशाळा

मुंबई :मुंबईमध्ये कुटुंब आणि आरोग्य मंत्रालय, भारत सरकार, युनीसेफ आणि नॅशनल हेल्थ मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिसेल, रुबेला आणि लसीकरण (micelles vaccination) यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. आशिष चौहान बोलत होते. यावेळी बोलताना, देशात ३८ कोटी बालकांचे लसीकरण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३२ कोटी बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पश्चिम बंगाल आणि दिल्ली या दोन राज्यात पालकांनी विरोध केल्याने लसीकरण मोहीम थांबली होती (Spread of micelles increased in India). मात्र पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे ९५ टक्के लसीकरण (anit micelles vaccination) पूर्ण झाले आहे. दिल्ली या एकाच राज्यात अद्यापही मोठ्या संख्येने बालके लसीकरणापासून वंचित आहेत अशी माहिती चौहान यांनी दिली. (UNICEF Workshop)

आरोग्य तज्ज्ञ डॉ. आशिष चौहान माध्यमांशी संवाद साधताना


वेळेवर लसीकरण करून घ्या :आईकडून बाळाला स्तनपानातून ६ महिन्यापर्यंत आवश्यक पोषक आहार मिळतो. त्यातून त्यांच्यात रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते. ते बालक रहात असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रसार होत असेल अशा वेळी ती शक्ती कमी पडते. त्यामुळे ९ महिन्याच्या खालच्या बालकांना मिसेल रुबेलाचा संसर्ग होत आहे. यासाठी आता ६ महिन्यावरील बालकांना लस दिली जात आहे. तर ९ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लस दिली जात आहे, असे चौहान यांनी सांगितले. आता जे मिसेलचे रुग्ण आढळून येत आहेत ते लसीकरण झाले नसलेले आढळून येत आहेत. लस घेतल्यावर इतर त्रास होतात अशी भीती असल्याने लोक आपल्या बालकांना लस देत नाहीत. मात्र आपल्या बालकांना पुढे कोणतेही आजार होऊ नये म्हणून वेळेवर लस द्यावी असे आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशनच्या डॉ. मीता यांनी केले आहे. कोरोना दरम्यान सेरो सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याच प्रमाणे मिसेल रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मीता यांनी दिली.


चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करू नका :१४ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२२ दरम्यान मिसेल रूबेलाबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पीआयबीकडून या बातम्यांची सत्यता तपासली असता त्यामधील ८६ टक्के बातम्या चुकीच्या होत्या. तर ९ टक्के बातम्या तटस्थ होत्या. यामुळे बातम्या देताना चुकीच्या देवू नये असे आवाहन पिआयबीच्या असिस्टंट डायरेक्टर स्मिता वत्स शर्मा यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details