महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RTE Admission: आरटीई प्रवेशाला  नागपूर- मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत ३० हजारपेक्षा अधिक अर्ज! - मुंबई विभाग

१७ फेब्रुवारीपासून राज्यभरात आरटीई प्रवेशाला (RTE Admission) सुरुवात झाली. पालकांनी आरटीई प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद (Spontaneous response) दिला आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल ३० हजार ८८४ अर्ज आले. नागपूर विभागात (Nagpur Division) जागांच्या तुलनेत अधिक अर्ज आले आहेत. शिवाय मुंबई विभागात (Mumbai Division) ६ हजार ४८१ जागेसाठी ३ हजारपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

RTE Admission
आरटीई प्रवेश

By

Published : Feb 19, 2022, 6:03 PM IST

मुंबई:बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ८ हजार ६१४ शाळांमध्ये ९५ हजार ५३७ जागा आहेत. मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी तब्बल ३० हजार ८८४ अर्ज आले. आरटीई अंतर्गत असलेल्या जागांच्या तुलनेत अधिक अर्ज फक्त नागपूर जिल्हात आले आहे. नागपूरमध्ये ६ हजार १८६ जागेसाठी अवघ्या तीन दिवसात ९ हजार ३८१ अर्ज आले आहे. त्यामुळे नागपुरात आरटीई प्रवेशासाठी आतापासून स्पर्धा दिसून येत आहे.

आरटीई प्रवेश
मुंबईतूनही तीन हजारांपेक्षा अधिक अर्जआरटीई प्रवेशाला दर वर्षी मुंबईतूनही चांगला प्रतिसाद मिळतोय . यंदाच्या २०२२-२३ शैक्षणिक वर्षांमध्ये सुद्धा आरटीई प्रवेशाला चांगला प्रतिसादात मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अवघ्या तीन दिवसांत तब्बल तीन हजारपेक्षा अधिक पालकांनी अर्ज केले आहेत. मुंबईमध्ये ३४३ शाळांमध्ये ६ हजार २२६ जागा आहेत.राज्यभरातून आलेले अर्ज

जिल्हा अर्ज
नागपूर- ९३८१
मुंबई- ३४३४
औरंगाबाद- ३०६८
जळगाव - १९०३
अमरावतीत- १९९४

९५ हजार ५३७ जागा
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ८ हजार ६१४ शाळांमध्ये ९५ हजार ५३७ जागा आहेत. गेल्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून ९३ हजार८०२ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details