मुंबई : श्रीराम नवमीच्या उत्सवानिमित्त ठाकूरद्वार येथील या काळाराम मंदिरात भाविकांची लागते. या मंदिराचे खास आकर्षण म्हणजे येथे असलेल्या काळ्या पाषाणाच्या पुरातन मूर्ती. प्रभू श्रीराम यांच्या मांडीवर विराजमान झालेली सीतामाता असून बाजूला लक्ष्मण, शत्रुघ्न आणि परमभक्त हनुमान हे देखील आहेत. या मंदिरात गेली 51 वर्ष कामाची सेवा करणारे गुरुजी गोविंदराव मनेरीकर हे आहेत. त्या मंदिराच्या शेजारीच श्री वेंकटेश मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. राम मंदिराच्या बाजूलाच लागून श्री स्वामी समर्थांचे छोटे मंदिर देखील आहे. या मंदिराची उभारणी प्राचीन आणि सागवान लाकडाची असून जुन्या पद्धतीची प्रकाशयोजना करण्यात आलेली आहे. श्री रामाच्या गाभार्यासमोरच या मंदिराची स्थापना करणारे आत्माराम बुवा यांची समाधी आहे.
कोण आहेत आत्माराम बुवा? :कोकणातल्या एका गावात गरीब कुटुंबात एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव आत्माराम. त्यांनी संपूर्ण देशाचे पर्यटन केलं. शेवटी ते मुंबई झाले. मुंबईत आल्यानंतर आत्माराम यांची पाठारे प्रभू यांच्याशी ओळख झाली. दरम्यान भाऊचा धक्का जाने बांधला ते भाऊ रसूल देखील आत्माराम बुवांचे भक्त बनले. मुंबईतील सध्या असलेल्या काळाराम मंदिराची जागा आत्माराम बुवांच्या पसंतीस पडली. त्या ठिकाणी भाऊ रसूल यांच्या मदतीने राम मंदिर बांधले. त्या मंदिरातील ग्रामपंचायतनच्या मूर्ती आहेत. त्या काळ्या पाषाणाच्या असल्याने या मंदिराला काळाराम मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 1828 मध्ये आत्माराम बुवांनी या राम मंदिराची स्थापना केली. ठाकूरद्वार येथील काळाराम मंदिराचे विश्वस्त समीर रणजीत त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली.