महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident CCTV : जॉगिंगला आले आणि हातपाय मोडून गेले; भरधाव कारने तिघांना उडवले - भरधाव कारने तिघांनी उडविले

भरधाव कारने जॉगिंग करणाऱ्या तीन नागरिकांना (Speeding Car Hit Three People) उडवले (speeding car running over three people). या अपघातात तिघेही गंभीर जखमी (three injured in a car accident) झाले असून हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (car accident caught on CCTV) झाला आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

Speeding Car Hit Three People
कार अपघात फोटो

By

Published : Nov 27, 2022, 5:21 PM IST

नवी मुंबई : घणसोलीत एका भरधाव कारने जॉगिंग करणाऱ्या तीन नागरिकांना (Speeding Car Hit Three People) उडवले (speeding car running over three people). या अपघातात तिघेही गंभीर जखमी (three injured in a car accident) झाले असून हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (car accident caught on CCTV) झाला आहे. घणसोली खाडी किनारी नियोजित पामबीच मार्गावर हा अपघात घडला आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

कार अपघात व्हिडीओ

अपघाताचा हा थरार सीसीटिव्हीत कैद :या पामबीच मार्ग परिसरातील नागरिक जॉगिंग तसेच व्यायामासाठी खाडीकिनारी जात असतात. तसेच शासनाने पोलीस भर्ती जाहीर केल्यापासून या ठिकाणी पोलिस भर्तीसाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या खासगी प्रशिक्षण संस्था देखील याच रस्त्यावर सरावासाठी येतात. पोलीस भरतीच्या सरावासाठी येणाऱ्या एका उमेदवाराने थेट रस्त्यावर चालणाऱ्या तीन नागरिकांना उडवले आहे. अपघाताचा हा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अशा या बेजबाबदार उमेदवारांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. बस चालकांशी देखील या पोलीस भरती उमेदवार आणि प्रशिक्षण संस्थांनी अनेकवेळा हुज्जत घातली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वाहनचालकांना कायद्याचे भय नाही:हे उमेदवार तसेच त्यांचे प्रशिक्षक सरावासाठी येताना अत्यंत वेगाने वाहने चालवतात परिणामी नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जॉगिंग करावे लागते. या धूम स्टाईल पोलीस भरती इच्छुक उमेदवारांना आत्ताच कायद्याची तमा नसेल तर मग पुढे पोलीस झाल्यावर काय होणार? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details