मुंबई - वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या ( Redevelopment of BDD Chaal) कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी राज्य शासनाला दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा ( BDD Chaal Redevelopment Project ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी आज आढावा घेतला. म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रुम महासंचालक राधेशाम मोपलवार आदी उपस्थित होते.
Redevelopment BDD Chaal : बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणीला गती द्या - मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Chief Minister Eknath Shinde directive
बीडीडी चाळींच्या ( Redevelopment of BDD Chaal ) कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी दिले आहेत. बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा ( BDD Chaal Redevelopment Project ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
१२८० गाळ्यांचा पुनर्विकास - अनिल डिग्गीकर यांनी प्रकल्पांच्या कामांबाबत सादरीकरण केले. वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथे एकूण १५९ बीडीडी चाळी ( Redevelopment of BDD Slum ) आहेत. वरळी येथील १२१ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात ३४ चाळी आणि २५२० गाळ्यांचा पुनर्विकास होत आहे. तर, नायगाव येथील ४२ पैकी पहिल्या टप्प्यात २३ चाळी आणि १८२४ गाळ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ना.म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात १६ चाळी आणि १२८० गाळ्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे.
सुविधांचा अंतर्भाव नवीन इमारतींमध्ये असणार - बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात रहिवाशांना विविध सोयी मिळणार असून व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगींग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, सिनिअर सिटीजन प्लाझा या सुविधांचा अंतर्भाव नवीन इमारतींमध्ये असणार आहे. पात्र निवासी झोपडीधारकांना सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २६९ चौरस फुट ऐवजी ३०० चौरस फुट देण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. चाळ परिसरातील पात्र निवासी झोपडीधारकांना संक्रमण शिबीराऐवजी मागणी केल्यास दरमहा भाडे देण्याच्या पर्यायास यावेळी मंजुरी देण्यात आली.