मुंबई Special Trains for IND vs PAK Match : भारत-पाकिस्तान सामना बघायला अहमदाबादला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेनं मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केलीय. मात्र, पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकिटं अवघ्या 17 मिनिटांत फुल्ल झाली. त्यामुळं मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं आणखी एका विशेष ट्रेनची घोषणा केलीय. ही विशेष ट्रेन आज रात्री 23.20 वाजता मुंबई सेंट्रल इथून सुटून उद्या सकाळी 7.20 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या विश्वचषक विशेष ट्रेनची क्षमता 1531 आसनांची आहे.
काय आहे दोन्ही रेल्वेचं वेळापत्रक : पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान दोन सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. ट्रेन क्रमांक 09013/09014 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल धावेल. ट्रेन क्रमांक 09013 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल आज 13 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई सेंट्रल इथून 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन क्रमांक 09014 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल अहमदाबादहून सामना झास्यानंतर रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन इथं थांबेल. तर दुसरी ट्रेन क्रमांक 09015/09016 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल ही विशेष ट्रेन आज रात्री 23:20 वाजता सुटून उद्या सकाळी 7:20 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन हमदाबादहून सामना झास्यानंतर रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी 2 वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मुंबई सेंट्रल इथं पोहोतेल. ही ट्रेन दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन इथं थांबेल.