महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या - special train on mahaparinirvandin

येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.

special train by central railway on mahaparinirvandin
महापरिनिर्वाणदिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या

By

Published : Dec 4, 2019, 10:01 PM IST

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून उपनगरीय मार्गावर 12 विशेष गाड्या, तर लांब पल्ल्याच्या मार्गावर 14 विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. लांब पल्याच्या 14 विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या सोलापूर, नागपूर आणि गुलबर्गा येथून सुटणार आहेत.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या

उपनगरीय मार्गावर दादर ते कुर्ला, ठाणे, कल्याण आणि कुर्ला ते वाशी-पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर अप दिशेला कुर्ला-दादर विशेष लोकल रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी, कल्याण-दादर रात्री १ वाजता, ठाणे-दादर रात्री 2 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे.

डाऊन दिशेला दादर-ठाणे मध्यरात्री 1 वाजून 15 मिनिटांनी, दादर-कल्याण मध्यरात्री 2 वाजून 25 मिनिटांनी आणि दादर-कुर्ला पहाटे 3 वाजता सोडण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर अप दिशेला वाशी-कुर्ला रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी, पनवेल- कुर्ला रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी आणि वार्शी-कुर्ला पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी चालविण्यात येणार आहे. डाउन दिशेला कुर्ला-वाशी रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी, कुर्ला-पनवेल रात्री 3 वाजता, कुर्ला-वाशी पहाटे 4 वाजता सुटेल. प्रवाशांनी या लोकलचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details