मुंबई -माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण ( Shamsher Pathan allegations ) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप ( Shamsher Pathan allegations against Param Bir Singh ) केले आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब ( Kasab) याला पोलिसांनी पकडले, त्यावेळी अजमल कसाब याच्याकडे सापडलेला मोबाईल फोन परमबीर सिंग ( Param Bir Singh ) यांनी लपवला, असा खळबळजनक आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे. याबाबत 26/11च्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम याबाबत बोलताना. काय म्हणाले उज्ज्वल निकम -
ते म्हणाले, 'यावर मी कोणतेही मतप्रदर्शन करणार नाही. मात्र, जे दहा दहशतवादी आले होते त्यांची प्रत्येकी दोन जणांची जोडी करण्यात आली होती आणि प्रत्येकाला एक मोबाईल दिला होता. त्यांचा मोबाईल कराचीमधील कंट्रोल रुमला कनेक्ट करण्यात आला होता. तसेच त्यांनी मुंबईतील काही पत्रकारांनादेखील फोन केले होते.'
'अजमल कसाबजवळ फोन होता की नाही, त्याच्या फोनचं काय झालं, हे तपास अधिकाऱ्यांना माहित असावं. मला त्याबाबत कल्पना नाही. अजमल कसाबचा फोन जर मिळाला असता तर निश्चित त्याचा फायदा झाला असता. कारण कसाबने 26/11ला इथे सीएसटीवर हल्ला केल्यानंतर त्याने कुणाशी संपर्क साधला होता, काय केलं होतं, हे सगळे डीटेल्स तपासता आले असते. अर्थात या जर-तर च्या गोष्टी आहेत. कसाबचा फोन का मिळाला नाही, तो फोन कुठे गेला, याचा शोध त्यावेळेला तपास अधिकाऱ्यांनी घेतला की नाही, याची मला कल्पना नाही.'
हेही वाचा -26/11 Attack : Shamsher Pathan allegations : कसाबकडील मोबाईल फोन परमबीर सिंग यांनी लपवला, माजी पोलीस अधिकाऱ्याचा आरोप