मुंबई :शाळेत जात असणाऱ्या अल्पवयीन मुलीला 'आयटम'(calling minor girl item) म्हणून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण (sexual abuse of minor girl) केल्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने (POSCO court molestation minor girl) आरोपी तरुणाला दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एखाद्या मुलीला उद्देशून 'आयटम' हा शब्द वापरला जातो हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने दिलेल्या निकालात नोंदविले गेले. त्यामुळे आरोपीला 'आयटम' शब्दाचा वापर करून छेड काढणे महागात पडले आहे. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची शिक्षा -अल्पवयीन पीडित मुलीची आरोपीने विनयभंग केल्याची ही घटना 2015 मध्ये घडली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी शाळेतून घरी जात होती. तेव्हा वाटेत एका तरुणाचे तिचा विनयभंग केला. या तरुणाने तिची छेड काढच तिला आयटम असे संबोधले होते. क्या आयटम कहाँ जा रही है? असे आरोपी युवक म्हणाला होता.