महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

judicial custody of Malik extends : मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (dawood ibrahim money laundering case) विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीत ( judicial custody ) १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : Apr 4, 2022, 1:24 PM IST

Updated : Apr 4, 2022, 3:03 PM IST

मुंबई:मंत्री नवाब मलिक यांची ईडी कोठडी संपल्यामुळे आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालया समोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना 18 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आर्थिक गैरव्यवहार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती सध्या नवाब मलिक के अर्थर रोड जेलमध्ये आहेत. नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले त्याचवेळी त्यानी सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल कासकरला अटक झाल्यानंतर मलिक यांचे एका प्रॉपर्टी खरेदी संदर्भात नाव समोर आले. मलिक यांना इडीने चौकशी साठी नेल्यानंतर राज्यांतील राजकरण चांगलेच ढवळून निघाले होते.

मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध. मलिकांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकली. कुर्ला येथील एलबीएस रोडला असलेल्या गोवा कंपाऊंड येथील करोडोची साडे तीन एकर जमीन 20 ते 30 लाखात मलिकांच्या नातेवाईकांना दिली. दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामधे पावर ऑफ अटरनी सलीम पटेल यांना लावत होत्या. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली. असे त्यांच्यावर आरोप आहेत.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले होते.

Last Updated : Apr 4, 2022, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details