मुंबई- राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारी एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले होते. केवळ 20 मिनिटांच्या या अधिवेशनात एससी, एसटी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. संसदेत एससी-एसटी आरक्षण मुदतवाढीचे विधेयक आधीच संमत झाले होते. त्यानंतर आता विधिमंडळातील या अधिवेशनात आरक्षण मुदत वाढीच्या विधेयकाच्या पाठिंब्याचा ठराव करण्यात आला.
केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभेतील अनुसूचित जाती व जमातीसाठी केलेले घटना दुरुस्ती विधेयक संमत केले आहे. संविधानातील अनुसूचित जाती जमाती संदर्भात राखीव जागांचे समर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.