मुंबई -भारतात बंदी असलेल्या पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) या संघटनेच्या पाच संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसाची मुदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ( Maharashtra Anti Terrorism Squad ) मुंबई सत्र न्यायालयातील ( Special Court Mumbai ) विशेष कोर्टात केली होती. विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एटीएसला ( Special Court Extends Time For Submit Charge Sheet ) 30 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.
एटीएसने मागितली आणखी 90 दिवसाची मुदतएटीएसच्या ( Maharashtra Anti Terrorism Squad ) वतीने आरोपींजवळून महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तसेच कॉल रेकॉर्ड देखील तपासात समोर आले आहेत. या प्रकरणात सखोल तपास सुरू असून आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसाची मुदत देण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे विशेष सत्र न्यायालयात ( Special Court Extends Time For Submit Charge Sheet ) एटीएसकडून करण्यात आली होती.
आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतया प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी करत तपास संस्थेने विशेष न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही प्रगतीपथावर असल्याचे एटीएसने ( Maharashtra Anti Terrorism Squad ) विशेष न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची अतिरिक्त मुदत वाढवून दिली आहे.
एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाईया संघटनेच्या संबंधित संशयिताविरोधात एनआयए ( NIA ) आणि एटीएसने ( Maharashtra Anti Terrorism Squad ) संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मुंबईतील मालाड, भिवंडी, कांदिवली, पालघर आणि कुर्ला या परिसरामधून संशयित पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मजझर खान, सादिक कुरेशी, असिफ खान, मोहम्मद इकबाल खान आणि मोमीन मिस्त्री या आरोपींचा समावेश आहे. महाराष्ट्र एटीएसने युएपीए देशविरोधी गतीविधी आणि आयपीसीच्या कलम १२० बी, १२१-ए, १५३-ए आणि यूएपीए कायदा १३(१) अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएस युनिट 10 विक्रोळीच्या वतीने या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीएफआयशी संबंधित 20 हून अधिक लोकांना अटकराज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यात एनआयएने एटीएसच्या ( Maharashtra Anti Terrorism Squad ) मदतीने पीएफआयच्या ( Popular Front of India ) कार्यालयावर छापे मारले आहेत. त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 106 जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्येही NIA ने छापेमारी केली होती. सेक्टर 23 मधल्या PFI च्या कार्यालयावर NIA ने छापा टाकला होता.