महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abdul Sattar : सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर देणार - कृषी मंत्री - Agriculture Minister Abdul Sattar

राज्यात सोयाबीनचा प्रश्न गंभीर बनला असून सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळावा यासाठी जे सरकार प्रयत्न करीत असून जे हमीभावापेक्षा कमी दर देतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी दिला आहे.

कृषी मंत्री
कृषी मंत्री

By

Published : Oct 13, 2022, 5:40 PM IST

मुंबई :राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी हमी भावापेक्षा कमी दर दिला जात ( Lower than guaranteed price to soybean farmers ) आहे. शेतकऱ्याला किमान नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा १०० ते ५०० रुपये अधिक दर राज्य सरकारकडून दिला जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली ( Agriculture Minister Abdul Sattar ) आहे. हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्यांवर शासन कारवाई करेल. तसेच राज्य सरकार सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यास तयार आहे त्यासाठी ही शेतकऱ्यांनी विचार करावा असेही अब्दुल सत्तार यांनी ( Abdul Sattar On Guaranteed Price Of Soybean ) सांगितले.

कृषी मंत्री

पावसाचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे : परतीच्या पावसाने राज्यातील सोयाबीनसह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अशा सर्व पिकांचे पंचनामे लवकरच केले जातील पंचनामे पूर्ण झाल्यानंतर खराब झालेल्या पिकांना शासकीय नियमानुसार मदत केली जाईल असेही सत्तार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details