महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दक्षिण मुंबईतला प्रचार संपला, आता वैयक्तिक भेटींवर भर - shiv sena

दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यात मुख्य लढत आहे.

दक्षिण मुंबईतला प्रचार संपला

By

Published : Apr 28, 2019, 11:47 AM IST

मुंबई- दक्षिण मुंबई मतदारसंघात गेले दोन आठवडे सुरू असलेला प्रचार शनिवारी थंडावला. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर उमेदवार वैयक्तीक भेटींवर भर देत आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय तसेच काही ठिकाणी झोपडपट्टी असलेला मिश्र असा हा मतदारसंघ असून अतिशय विविध पद्धतीने या मतदारसंघात प्रचार झाला असून सर्वाधिक भर हायटेक प्रचारावर देण्यात आला. छोट्या जाहिराती, जिंगल्स, व्हॉट्स अप, ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमाने या मतदारसंघात प्रचार झाला.

दक्षिण मुंबईतला प्रचार संपला
दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा आटोपल्यानंतर सावंत यांनी लोअर परेल, शिवडी आणि कुलाबा इथल्या शाखाप्रमुखांची बैठक घेतली. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने वैयक्तिक जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना सावंत यांनी शिवसैनिकांना दिल्या.तर काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी बाईक रॅली काढली. गर्दीच्या क्रॉफोर्ड मार्केट, चिरा बाजार आणि पुढे ग्रांट रॉड परिसरापर्यंत मोठ्या संख्येने यात युवक सहभागी झाले होते. गेल्या ४ वर्षांतली मरगळ आता आघाडीच्या नेत्यांनी झटकली असून त्याचा परिणाम निकालात दिसेल, असे देवरा यांनी संगितले. संध्याकाळी विविध मंडळांना भेटी देण्याचा कार्यक्रम असून हा प्रचाराचा भाग नाही. केवळ वैयक्तिक संबंध असल्याने भेटी होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details