LIVE UPDATE
- 5.55 - शिवसेना उमेदवार अरविंद सावंत ९९ हजार मतांनी विजयी
- 12.30 - दक्षिण मुंबईत 10 व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण, एकूण 22 फेऱ्या होणार.. शिवसेना अरविंद सावंत 153420 मते, मिलिंद देवरा 106161 मते, अनिलकुमार 8757 मते
- 12.12 - शिवसेना अरविंद सावंत - 130700 मते, काँग्रेस मिलिंद देवरा 87933 मते, वंचित बहुजन आघाडी अनिलकुमार 7044
- 11.50 - दक्षिण मुंबई मतदारसंघात 'नोटा'चा उमेदवारांना फटका, आतापर्यंत तब्बल 4100 नोटा मते..
- 11.30 - काँग्रेसचे मिलिंद देवरा चौथ्या फेरीतही पिछाडी वर .. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी घेतली 29489 मतांची आघाडी... अरविंद सावंत शिवसेना- 104033, मिलिंद देवरा ( काँग्रेस) 74544, अनिलकुमार (वंचित) 5328
- 10.40 - तिसरी फेरी... अरविंद सावंत - 60866, मिलिंद देवरा 35312, अनिल कुमार 3312, नोटा- 2335
- 10.15 - दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत 21546 मतांनी आघाडीवर
- 9.45 - 15 हजार 905 मतांनी शिवसेनेचे अरविंद सावंत आघाडीवर
- 9.15 - पहिली फेरी - अरविंद सावंत- 9578 ( शिवसेना), मिलिंद देवरा- 4244 ( काँग्रेस), अनिल कुमार 179 (वंचित)
- 9.02 - पाहिल्या फेरी अखेर.. अरविंद सावंत 5304 मतांनी आघाडी वर
- 8.30 - शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आघाडीवर
मुंबई - दक्षिण मुंबईच्या नागरिकांनी कुणाच्या बाजून कौल दिला आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच निकाल हाती येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहाही मतदारसंघासह दक्षिण मुंबईत २९ एप्रिलला मतदान पार पडले होते. यावेळी २०१४ च्या निवडणुकीपेक्षा जवळपास एक टक्के कमी मतदान झाले.
दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. यावेळी हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेनेला लढत द्यावी लागत आहे. मुस्लीम, जैन समाजाची मते आपल्याकडे खेचून आणण्याची स्पर्धा उमेदवारांमध्ये होती. अमराठी मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराचा विजय पक्का आहे. देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व उदय कोटक यांनी पाठिंबा जाहीर केल्याने व्यापारी वर्गात तसेच गुजराती आणि मारवाडी समाजात वेगळा संदेश गेला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यावेळी ५१.४६ टक्के मतदान झाले. २०१४ ला येथे ५२.४९ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या टक्केवारीत कोणताही मोठा फरक न पडल्याने दक्षिणेतील लोक कोणाला कौल देणार याची उत्सुकता लागली आहे.