मुंबई -अभिनेता सोनू सूद कोरोना काळात खूप चर्चिले जात आहेत. सोनू हे स्वत: रस्त्यावर उतरून परराज्यातील मजुरांना घरी पोहचण्याची आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत आहेत. समाज माध्यमांचा वापर करून ते अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित रहाण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, असं असतानाही, काही जण या प्रवाशांकडून सोनू सूद यांच्या नावाखाली प्रवास खर्चाची मागणी करत आहेत. यासंबंधी सोनू यांनी ट्वीटर वरून ट्वीट करत, प्रवाशांना आवाहन केले की, हा प्रवास संपूर्ण मोफत आहे. जर कोणी पैशांची मागणी केली तर मला संपर्क करा किंवा पोलिसांकडे तक्रार करा.
सोनू सूदच्या नावाने काही भामटे करतायत मजूरांकडून पैसे वसूल, ट्वीट करत सोनूने दिली माहिती - सोनू सूद प्रवासी कामगार
अभिनेता सोनू सूद कोरोना काळात खूप चर्चिले जात आहेत. सोनू हे स्वत: रस्त्यावर उतरून परराज्यातील नागरिकांना घरी पोहचण्याची आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत आहेत. समाज माध्यमांचा वापर करून ते अडकलेल्या नागरिकांना आवाहन करत आहेत.
अभिनेता सोनू सूद
सोनू सूद यांनी आपल्या ट्वीटरवर काही स्क्रीनशॉटस् शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही जण प्रवाशांना पैशांची मागणी करत होते. निसर्ग वादळामुळे मुंबईच्या किनारी राहणाऱ्यांवर मोठं संकट कोसळलं होतं. मात्र, सोनू आणि त्यांच्या टीमने तेथील 28 हजार लोकांना जेवण पोहचवले.