मुंबई -काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक समान रणनीती ठरवण्यासाठी आज (20 ऑगस्ट) संध्याकाळी मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
'हे' मोठे नेते राहणार हजर
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन असे मोठे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. संध्याकाळी 4 वाजता बैठक सुरू होईल, ज्यात सर्व नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होतील.