नवी मुंबई Son Killed Mother : नवी मुंबईतील वाशी परिसरातील कोपरी गावातील सागर भोईर इमारतीत रुपंचांद शेख (21) व त्याची आई सलमा उर्फ जहनारा खातून शेख हे दोन मायलेक राहत होते. मात्र, रूपंचांद शेख हा काहीच कमधंदा करीत नव्हता. तो सतत त्याच्या मित्रांसोबत उनाडक्या करीत होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी ही रूपंचांदची आई सलमा यांच्यावर येत होती. (Accused Son Arrested) त्यामुळे रूपंचांदने काहीतरी कमवून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा अशी सलमा यांची इच्छा होती. त्या सतत आपल्या मुलाला कामावर जाण्यासंबंधी सांगत असत. मात्र, आईने कितीही वेळा सांगितलं तरी रूपंचांद आईचं ऐकत नसायचा. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. (Mumbai Crime)
आईचा केला गळा दाबून खून:कामधंदा न करता रुपंचांद हा आयते तुकडे तोडत असल्याने, आई-मुलात रविवारी मध्यरात्री सव्वा एक-दीडच्या सुमारास पुन्हा कामावर जाण्यावरून जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात रूपंचांदने घरातील पटक्याने गळा आवळून सलमा यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जवळच राहणारी रूपंचांदची बहीण जासमीन रामभरोस ताती (23) घरी आली व तिने सलमाच्या खून प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व रूपंचांदच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला. आरोपी रूपंचांद शेख याला अटक केली असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डमाळे अधिक तपास करीत आहेत.