मुंबई- राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलतापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पंधरा सहकारी लवकरच भाजपाच्या संपर्कात येतील, अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही आमदारांसोबत भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा पद्धतीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
अंजली दमानिया यांचे ट्विट ठरले कारणसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच एक ट्विट केले होते. 15 आमदार अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या संपर्कात आहेत. राजकारण किती खालच्या पातळीला जातोय पाहूया असे ट्विट केले होते. या ट्विटमुळे राजाच्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नक्कीच काहीतरी होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी स्वतः या बातमीचे खंडन केले आहे. असे काहीही चित्र नाही. आपण काही कामानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटत असतो. यामध्ये जनतेच्या हिताचा अनेक प्रश्नांचा समावेश असतो. त्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये असे म्हटले आहे.
का झाली चर्चा सुरू?राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसी व अदानी उद्योग समूहाबद्दल व्यक्त केलेली भूमिका या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपाशी जवळीक साधत आहे अशी चर्चा सुरू झाली. त्यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची राज्यातील काही प्रश्नांसाठी भेट घेतली होती. तसेच जरंडेश्वर साखर कारखाना चौकशीबाबत अजित पवार यांना अभय मिळावे यासाठी, भाजपची जवळीक साधली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.