मुंबई- देशात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील केइएम आणि टाटा रुग्णालयतील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय परिसरात खाण्यासाठी काहीच मिळत नाही. त्यामुळे काही सामाजिक संस्था याठिकाणी जेवण देण्याचे काम करत आहेत.
रुग्णालयाबाहेर सामाजिक संस्थांकडून जेवन वाटप... हेही वाचा-''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''
मुंबईतील केइएम आणि टाटा रुग्णालयल हे अत्याधुनिक सुविधायुक्त असे रुग्णालय आहे. त्यामुळे याठिकाणी उपचारासाठी राज्यभरातून रुण येतात. सध्या राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हाॅटेल्स बंद आहेत. त्यामुळे रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची तारांबळ झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन याठिकाणी जेवण देण्याचे काम केले आहे.
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी 519 वर पोहोचली. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्युमुळे देशातील करोनाबळींची संख्या 10 वर गेली. देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, टाळेबंदी झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत असल्याने आवश्यकता भासल्यास संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. अखेर केंद्राने 21 दिवसांची देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीवेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासने केले आहे.