महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

SNDT Womens University Center : एसएनडीटी महिला विद्यापीठ केंद्र बल्लारपूर येथे सुरू होणार - उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील - Guardian Minister Sudhir Mungantiwar

राज्याच्या दुर्गम भागात म्हणजेच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर या ठिकाणी येत्या जून महिन्यापासून श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी अर्थात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे केंद्र ( SNDT Womens University Center ) सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Higher Education Minister Chandrakant Patil ) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

SNDT Womens University Center
एसएनडीटी महिला विद्यापीठ केंद्र बल्लारपूर येथे सुरू होणार

By

Published : Nov 1, 2022, 10:57 PM IST

मुंबई : राज्याच्या दुर्गम भागात म्हणजेच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर या ठिकाणी येत्या जून महिन्यापासून श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी अर्थात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे केंद्र ( SNDT Womens University Center ) सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Higher Education Minister Chandrakant Patil ) यांनी याबाबत माहिती दिली आहे.


शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना फायदा - राज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर तसेच औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये विद्यापीठे आणि विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू आहे. या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र दुर्गम भागातील तालुक्याच्या ठिकाणी विद्यापीठाचे केंद्र किंवा उपकेंद्र नसल्यामुळे उच्च शिक्षणातील संशोधन आणि शिक्षण यापासून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वंचित राहतात त्यावर उपाय म्हणून विदर्भातील बल्लारपूर या ठिकाणी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत ( Higher Education Minister Chandrakant Patil ) पाटील यांनी दिली.


उच्च शिक्षणामध्ये महिलांना प्राधान्य मिळेल - या निर्णया यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ( Guardian Minister Sudhir Mungantiwar ) यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे आणि विदर्भातील बल्लारपूर सारखा दुर्गम भाग या ठिकाणी देखील या विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. जेणेकरून उच्च शिक्षणामध्ये महिलांना प्राधान्य मिळेल.

तरच विद्यार्थ्यांना लाभ होईल - राज्याच्या राजकारणात तीन मोठे उद्योग राज्याबाहेर जात असल्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड असंतोष तर शासनाच्या मनात चलबिचल पाहायला मिळते. त्यास पार्श्वभूमीवर दुर्गम भागात एस एन डी टी महिला विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात शिक्षणतज्ञ अरविंद वैद्य यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, दुर्गम भागात महिला विद्यापीठ होत आहे, याचे स्वागत आहे. मात्र किती पैसे भरून उच्च शिक्षण मिळेल, की शासन या सगळ्यांचा खर्च करेल, हे शासनाने जाहीर करायला हवे. तरच दुर्गम भागातील या विद्यापीठांचा खरा लाभ विद्यार्थ्यांना होऊ शकेल.

ABOUT THE AUTHOR

...view details