मुंबई - कांदिवली पोलिसांनी सापांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत मांडूळ प्रजातीचा साप जप्त केला आहे. या सापाची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे समजते. पोलिसांच्या अटकेत असलेले आरोपी साप पकडून विकत होते. मांडूळ सापाची पिल्ले पाळून त्यांची वाढ झाल्यावर विकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळ सापाची तस्करी; २ जणांना अटक - पोलीस
या प्रकरणी पोलिसांनी सुनिल माने (२५) आणि संतोष अहीर (३०) या दोघांना अटक केली आहे. कांदिवली पोलिसांना भांडूप परिसरात सापांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. या सापळ्यात मांडूळ तस्कर सापडले.

मांडूळ
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुळे
या प्रकरणी पोलिसांनी सुनिल माने (२५) आणि संतोष अहीर (३०) या दोघांना अटक केली आहे. कांदिवली पोलिसांना भांडूप परिसरात सापांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. या सापळ्यात मांडूळ तस्कर सापडले. त्यांच्याकडून ३ फूट लांबीचे मांडूळ जप्त करण्यात आले आहे.या दुर्मीळ मांडूळ सापाबद्दल अनेक गैरसमज असून, जादूटोण्यासाठी याचा वापर केला जातो. या सापाला दुतोंडी साप म्हणून ओळखले जाते.