महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोरिवलीत मगरीच्या पिल्लांची तस्करी; वनक्षेत्रपाल पथकाच्या कारवाईत तिघांना अटक

बोरिवली वनक्षेत्रपाल पथकाने केलेल्या कारवाईमध्ये मगरीच्या दोन पिल्लांना हस्तगत केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन दुर्मिळ पिल्लांना बसमधील प्रवाशी बॅगेत ठेवण्यात आले होते. वनक्षेत्रपाल पथकाने धाड मारून ही पिल्ले हस्तगत ताब्यात घेतली.

बोरिवलीत मगरीच्या पिल्लांची तस्करी

By

Published : Sep 17, 2019, 7:22 PM IST

मुंबई - बोरिवली वनक्षेत्रपाल पथकाने केलेल्या कारवाईमध्ये मगरीच्या दोन पिल्लांना हस्तगत केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन दुर्मिळ पिल्लांना बसमधील प्रवाशी बॅगेत ठेवण्यात आले होते. वनक्षेत्रपाल पथकाने धाड मारून ही पिल्ले हस्तगत ताब्यात घेतली.

हेही वाचा -मुंबईत ६७२ कोटी खर्च करून शीव रुग्णालयाच्या तीन नवीन इमारती बांधणार

सोमवारी बोरिवली परिसरात एमएच १२ क्यूडब्लू ९६१७ या प्रवासी बसच्या डिक्कीत मगरीची दोन पिल्ले लपवण्यात आली होती. या प्रकरणी बसचा वाहनचालक मोहम्मद अब्दुल रहिम हाफिस (वय-३३) खुद्दुस लतीफ बेग (वय-३८), शिवाजी बलाया (२८) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपी हे हैदराबाद व कर्नाटक येथील राहणारे आहेत. हस्तगत करण्यात आलेले मगरीची पिल्ले ही वन्य प्राणी वन संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित वन्यप्राणी असून यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. याच कायद्यानुसार आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -नाणारचं झालं तेच आरेचं होईल - उध्दव ठाकरे

हेही वाचा - 'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...

ABOUT THE AUTHOR

...view details