महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेरी घडी चलती हैं, काँग्रेस राष्ट्रवादीची बंद पडली; स्मृती इराणींचा काँग्रेसवर गुजराती भाषेत हल्लाबोल

गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुजराती भाषेत भाषण केले. नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी मतदान करा, असे आव्हान त्यांनी केले. विलेपार्लेच्या धर्मा विला येथे भाजपचे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग अळवणी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत स्मृती इराणी बोलत होत्या.

स्मृती इराणी

By

Published : Oct 12, 2019, 2:12 AM IST

मुंबई - विलेपार्ले मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुजराती भाषेत भाषण केले. नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी मतदान करा, असे आव्हान त्यांनी केले. विलेपार्लेच्या धर्मा विला येथे भाजपचे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग अळवणी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत स्मृती इराणी बोलत होत्या.

मेरी घडी चलती हैं, काँग्रेस राष्ट्रवादीची बंद पडली

मेरी घडी चलती हैं, काँग्रेस राष्ट्रवादीची बंद पडली आहे, असा टोला त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सध्याच्या परिस्थितीवर लगावला. मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा काँग्रेसमधील दिल्लीतील सरकार शांत बसली होती. मात्र मोदी सरकारच्या सत्तेत मुंबईत महिला सुरक्षित असून एकही बॉम्बस्फोट झाला नसल्याचे त्या म्हणाल्या. तसेच 370 कलमाला विरोध केल्याप्रकरणी राहुल गांधी व काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. अमेठीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले तेव्हा गुजराती म्हणून माझा अपमान करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधी आता प्रचारासाठी मुंबईत आल्यास त्यांना त्यांची जागा दाखवा, असेही त्यांनी गुजराती भाषिकांना आवाहन केले. भ्रष्टाचारमुक्त भारत, महिला शक्ती सध्या मुंबईत दिसत असल्याचेही त्या म्हणाल्या.

राहुल गांधी मुंबईत प्रचारासाठी येणार असल्याचे पत्रकारांनी मला विचारले, तेव्हा त्यांची कोणतीही गॅरंटी नाही ते केव्हा दिल्लीत तर केव्हा बँकॉगमध्ये असतात. त्यामुळे ते खरंच मुंबईत येणार काय, यावर विश्वास नसल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. गेले कित्येक वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली आहे. मात्र आता राहुल गांधींना सत्तेचा विसर पडला असून सेवा त्यांना माहीतच नसल्याची टीकाही इराणी यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details