महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सण उत्सव झाले रद्द, पूजेच्या वस्तू विकणाऱ्यांवर संक्रांत - सण उत्सव रद्द न्यूज

मुंबईतील गणेशोत्सव आणि आषाढी एकादशीला असणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे सण-उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात जे पूजेचे साहित्य लागते, ते पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांचा उत्पन्नाचा स्त्रोतच ठप्प झाला आहे. अगोदरच लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे या कामगारांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यानंतर आता लॉक डाऊन उठवला गेला. जनजीवन पूर्व पदावर येऊ लागले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध लागू केले. याच निर्बंधाच्या कचाट्यात आपल्या संस्कृतीतील महत्वाचे सणही सापडले

cancled festivals due to corona
पूजेच्या वस्तू विकणाऱ्यांवर कोरोनाची संक्रात

By

Published : Jul 5, 2020, 12:37 PM IST

मुंबई- देशभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्याासठी गेली तीन महिने देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. लहान-लहान उद्योजक व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे पूजेच्या
साहित्य विक्री करणार्‍यांचे देखील उत्पन्न बंद पडल्याने हे लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून मुंबईतील गणेशोत्सव आणि आषाढी एकादशीला असणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे सण-उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात जे पूजेचे साहित्य लागते, ते पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांचा उत्पन्नाचा स्त्रोतच ठप्प झाला आहे. अगोदरच लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे या कामगारांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यानंतर आता लॉक डाऊन उठवला गेला. जनजीवन पूर्व पदावर येऊ लागले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध लागू केले. याच निर्बंधाच्या कचाट्यात आपल्या संस्कृतीतील महत्वाचे सणही सापडले. हे सण मोठ्या प्रमाणात साजरे न करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, या सण-उत्सव काळात पूजापाठ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पूजेच्या साहित्याची खरेदी विक्री होत असते आणि यावर छोटे मोठे पूजा साहित्य विक्रेते व्यावसायिक अवलंबून असतात. आता मात्र सण-उत्सव रद्द झाल्याने पूजेला मोठ्या प्रमाणात लागणारे साहित्य यंदा विक्री होणार नाही. त्यामुळे हे साहित्य विक्री करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

मुंबईतील दादर किर्तीकर मार्केट हे पूजेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या या मार्केटमध्ये ते 100 पेक्षा अधिक पूजेचे साहित्य विक्री करणारे दुकान आहेत .गेल्या तीन महिन्यात लॉकडाऊन मध्ये हे संपूर्ण मार्केट बंद होतं . मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे बाजार सुरू झाले आहे. मात्र गणपती उत्सव आणि आषाढी कार्यक्रम जे या वस्तू विक्री करणाऱ्यांचा सर्वात मोठा कमाईचा काळ असतो तो यंदा रद्द झाला. त्यामुळे या दुकानदानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अगोदरच कसे बसे तीन महिने काढले, त्यात पुढे सण उत्सव नसल्याने घर कसं चालवायचं अशी चिंता दुकानदार व्यक्त करताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details